बुलढाणा अर्बन शाखा हिवरखेड तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप.
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राधेश्यामजी चांडक ऊर्फ भाईजी व चीफ मॅनेजिंग डायरेक्टर सुकेशजी झंवर साहेब याचे संकल्पनेतून अकोला विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री विठ्ठल दळवी,श्री उमाकांत राखोडे यांचे मार्गदर्शनतून शाखा हिवरखेड तर्फे डॉ सुकेशजी झंवर याचे वाढदिवसा निमित्त सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा चंदनपूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. या अगोदर सुद्धा बुलढाणा अर्बन बँक शाखा हिवरखेड तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. सदरहू कार्यक्रमात शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर चोपडे ,कर्मचारी श्री विकास जाणे, नितीन बावणे,रुपेश यादव,शुभम तवलकार ,अरुण सेगर, अल्पबचत प्रतिनिधी जितेंश कारिया, दीपक राऊत. नरेश जयस्वाल, विनोद तळेकार इत्यादी उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री वानखडे सर,कोळसकर सर यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमा बद्धल आभार व्यक्त केले.