मनपात आपत्ती धोके निवारण दिवसानिमित्त अधिकारी/कर्मचा-यांनी घेतली सामुहिक प्रतिज्ञा.
अकोला दि. 13 ऑक्टोंबर 2023 – संयुक्त राष्ट्र संघाने घोषीत केल्यानुसार राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने दरवर्षी दिनांक 13 आक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाने दिनांक 8 सप्टेंबर 2017 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून दरवर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये व राज्य पातळीवर दिनांक 13 ऑक्टोंबर हा दिवस “आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्याबाबत सुचना दिल्या आहेत, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटीबद्ध होण्यासंदर्भात सन 2023 या वर्षी प्रतिज्ञा तयार केली आहे. त्या अनुषंगाने आज दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता अकोला महानगरपालिका मुख्य कार्यालय आणि चारही क्षेत्रीय कार्यालय येथे अधिकारी/कर्मचा-यांव्दारे सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली आहे.
यावेळी नगर रचनाकार आशिष वानखडे, मनपा प्रशासन अधिकारी अनिल बिडवे, चारही क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, दिलीप जाधव, विधी अधिकारी शाम ठाकुर, भांडार विभाग प्रमुख शाम राऊत, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, साप्रवि चे संतोष नायडू, संजय खराटे, राजेश सोनाग्रे, शहर समन्वयक अफाक यांचेसह मनपा व चारही क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी/कर्मचा-यांची उपस्थिती होती.