अकोला मनपा बडतर्फ कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही राजकुमार जवादे मनपा उपआयुक्त यांना दिले निवेदन
अकोला :-बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाअकोला जिल्ह्याची नविन कार्यकारिणी घोषित होताच महानगरपालिकेतील बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना थांबवलेले लाभ त्वरीत देण्यासाठी आज दि.13 आक्टोंबर 2023 रोजी महानगरपालिका
उपआयुक्त (प्र.) गिता वंजारी यांना निवेदन देण्यात आले. मनपाशी प्रकरणाचा सबंध नसतांना कर्मच्यां-र्यांवर दोष नसताना आकसापोटी बडतर्फ करण्यात आले. यांमुळे परिवारावर आर्थिक संकट कोसळले असल्याने घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. या टेन्शन मध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू ही झाला आहे. याला जवाबदार कोण? अकोला मनपा प्रशासनाने त्याच्या वारसांना यां लाभपासुन वंचित ठेवले आहे. या कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत आयुक्त तथा प्रशासक यांनी बडतर्फ केले. परंतु या कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना व मनपा शी सबंधीत नसतांना आकसापोटी बडतर्फची कार्यवाही करण्यात आली. असे आरोप हि करण्यात आले आहे.यावर तत्काळ योग्य कार्यवाही करुन मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांना सेवेचा लाभ जसे जिपीएफ, ग्रजुटी,रजा रोखीकरण,व पेन्शन व जे कर्मचारी सेवेत आहे त्यांना सेवेत समवून घेण्यात यावे. निवेदन देण्यात आले.याप्रसंगी
बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे ( चंद्रपूर ) राष्ट्रीय महासचिव पि.एच.गवई ( बुलढाणा), महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.शेषराव रोकडे,(नागपुर) राज्याचे संघटन सचिव सिध्दार्थ डोईफोडे,(पुलगाव ) राज्याचे सचिव सिध्दार्थ सुमन,(भद्रावती) राज्याचे कोषाध्यक्ष प्रा.अशोक ठवळे,( वरुड ) राज्याचे सचिव क्र. 2 नरेश मुर्ति अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश बोदडे, जिल्हा सचिव म्हणून प्रा.श्रीक्रृष्ण घ्यारे, सह-सचिव सुनिल इंगळे, संघटन सचिव – अविनाश वासनिक, कोषाध्यक्ष – कैलास भाऊ जोंधळे, विधी सल्लागार एडवोकेट चंद्रशिल दंदि व एडवोकेट बि.आर वाकोडे, पत्रकार डि.जे वानखडे, अशोक बन्सोड,साहेबराव कांबळे, रामकृष्ण बोरकर,रोहित डोंगरे, नाना घरडे, संजय खंडारे, नाना बोरकर यांची उपस्थिती होती.