पातूर तालुका अखिल भारतीय माळी महासंघ आढावा बैठक संपन्न
पातूर :: अखिल भारतीय माळी महासंघ पातूर तालुक्याच्या वतीने आढावा बैठक संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष ॲड. प्रकाश दाते, प्रदेश संघटक – गणेशराव काळपांडे, जिल्हा कार्याध्यक्ष- प्रा.डाॅ. नितीन देऊळकार, जिल्हा सचिव- मनोहर उगले, जिल्हा उपाध्यक्ष- गणेशराव म्हैसने, कार्यकारिणी सदस्य- विजयराव बोचरे , जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष – सुनील वावगे सर ह्यावेळी प्रमुख म्हणून उपस्थित होते. पातूर येथील एज्युविला पब्लिक स्कूल गाडगेवाडी येथे सायंकाळी ५.०० वाजता आयोजित सभेत तालुका कार्यकारिणी पुनर्गठन बाबत चर्चा करण्यात आली. ग्राम शाखा स्थापन करून, नंतर तालुका कार्यकारिणी गठित करण्यात यावी असे यावेळी ठरले. ह्या वेळी सामाजिक संघटन, आरक्षण, शैक्षणिक , व राजकीय परिस्थितीवर या वेळी मंथन करण्यात आले. सभेला सर्वश्री गजाननराव वावगे, रमेशराव निमकंडे, प्रल्हादराव गि-हे गुरुजी, पुंडलिराव निखाडे, गणेशराव राऊत, गजाननराव बारताशे, मोहन गाडगे, राजेश अत्तरकार,सागर कढोणे, संदिप गि-हे, गजानन येनकर, प्रशांत काळपांडे सह नागरिक उपस्थित होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा