नवरात्र विषयक माहिती

🚩🔱 नवरात्र विषयक माहिती

पंडीत व्यंकटेश देशपांडे
मो 7499121664/9881601459

🔱 नवरात्र/घटस्थापना रविवार दि.१५|१०|२३ रोजी सुरू होत आहे व सोमवार दिनांक २३|१०|२३ रोजी संपतेय दि.२४ ला दसरा आहे.

🔹नवरात्रीचे प्रकार. .कोणत्या दिवशी कसे सुरू करावेत .👉
▪️घटस्थापना दि.१५
▪️सप्तरात्रौत्सव दि.१७ पासून
▪️पंचरात्रौत्सव दि.१९ पासून
▪️त्रिरात्रौत्सव दि.२१ पासून
▪️एक रात्रौत्सव दि.२२ रोजी
▪️ललिता पंचमी दि. १९ रोजी
▪️घागरी फुंकणे दि.२१ ला आहे
▪️महा अष्टमीचा उपवास दि.२२ ला तर महा नवमीचा उपवास दि.२३ ला
▪️नवरात्र सांगता दि.२३ ला आहे /घट उठविणे. .

🔹 नवरात्रीची ४ प्रमुख अंगे आहेत
१) देवता स्थापन २) मालाबंधन
३) अखंड नंदादीप ४) कुमारीका पूजन..

🔹नवरात्र बसवल्यावर ज्या देवतेचे ‘नवरात्र ‘ असते त्या देवतेची पूजा करताना देवाचा / देवीचा टाक न हलवता फुलांनी किंचित पाणी शिंपडून,रोज फुले बदलून पुजा करावी मात्र इतर देव नेहमी प्रमाणेच ताम्हणात घेऊन दुधपाणी घालून रोजच्या सारखी पूजा करावी मात्र काही लोक नवरात्र बसविल्यावर
इतर देवांचीही पूजा करीत नाही – देव हलवित नाहीत हे शास्त्राला धरून नाही हा समज निव्वळ चुकीचा आहे.

🔹प्रकृती खराब असेल – झेपणार नसेल तर वयोमानापरत्वे शक्य नसेल तेव्हा नवरात्र बसवितांना चा १ला दिवस व शेवटचा दिवस (उठता- बसता ) असे २ व नवमीचा १ असे ३ दिवस उपवास केला तरी चालतो किंवा फक्त अष्टमीचा ही करता येईल आणि नवमी स धान्य फराळ (भाजके अन्न ) करावा.

🔹नवरात्रात “अखंड नंदादीप” लावला जातो त्यावर काजळी आल्यावर तो विझतो अगर वाऱ्याने, हवेने विझतो /मालवतो ते अशुभ नाही कुठलीही शंका न घेता दिव्याची वात स्वच्छ करून काजळी काढून वा बदलून तो परत लावावा ते आत १|२ कापराच्या वड्या बारीक करून टाकल्या तर काजळी येत नाही आणि वात मंद व शांत जळत राहील व प्रकाश ही स्वच्छ पडेल.

🔹देवीस बाहेरून वस्तू आणून वाहतांना स्वच्छ करून वाहाव्यात ( जसे फुले,तुलसीपत्र, दुर्वा, इत्यादीं)

🔹शक्यतो घरात तयार केलेलेच पदार्थ नैवैद्यास ठेवावे श्रध्देने- आत्मसमर्पणाने आनंदाने उत्सव साजरा करावा त्याचे चांगले फळ मिळते.

🔹अष्टमीचे पूजनासाठी रात्रौ १२|| ते १|| ही वेळ घ्यावी कारण त्या आधी कधी कधी सप्तमी असू शकते.

🔹 दसरा (विजया दशमी ) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने शुभ मानतात पण त्या दिवशी विवाह- वास्तू निक्षेप/शांती इ.शुभ कामे करू नयेत कारण अश्विन महिना हा त्यासाठी त्याज्य आहे मात्र वाहन खरेदी,घर खरेदी,कलशपूजन इ.करू शकता.

🔹नवरात्र म्हणजे ९ दिवस असते असे नाही.

🔹काळ्या मातीत सप्त धान्य हळदीच्या पाण्यात बुडवून पेरावेत घट बसविल्यावर रोज सुवासिक फुलांची माळ बाधांवी.

🔹शक्यतो परान्न ( दुसऱ्याचे घरी) घेऊ नये.ब्रम्हचर्य पालन करावे पलंग,गादी,दाढी,कटींग वर्ज्य करावे.

🔹नवरात्रात नवदुर्गा ९ आहेत त्याप्रमाणे रोज एकीचे पूजन केले जाते त्या अशा आहेत 👉
१.शैलपुत्री २.ब्रह्मचारिणी ३.चंद्रघंटा ४. कुष्मांडा ५. स्कंदमाता ६.कात्यायनी ७. कालरात्री
८.महागौरी ९.सिद्धीधात्री

🔹रोज एका कुमारीकेस वाढत्या वयाच्या क्रमाने बोलावून तिचे पाद्यपूजा, दुग्धपान, फलाहार, अल्पोपहार देऊन शेवटचे दिवशी जेवण – वस्त्र- अलंकार-उपयोगी वस्तू देऊन पुजन करून आशीर्वाद घ्यावेत.

🔹स्कंद पुराणात वयानुसार कुमारिका पूजन त्याचे फळ सांगितले आहे देवी व्रतांमध्ये कुमारिका पूजन परमावश्यक आहे /असते.
१ वर्षाची कुमारीका.
फळ 👉 मोक्ष व भोग प्राप्ती.
२ वर्षाची कुमारी.
फळ 👉 ऐश्वर्य प्राप्ती
३ वर्षाची त्रिमूर्तीनी
फळ 👉 धर्म, अर्थ, काम,मोक्ष
४ वर्षाची कल्याणी
फळ 👉 राज्यपद प्राप्ती
५ वर्षाची रोहिणी
फळ 👉 विद्या प्राप्ती
६ वर्षाची काली
फळ 👉 षट्कर्म सिध्दी
७ वर्षाची चंडीका
फळ 👉राज्य प्राप्ती
८ वर्षाची शांभवी
फळ 👉 संपत्ती प्राप्ती
९ वर्षाची दुर्गा
फळ 👉 पृथ्वी वरील राज्य
१० वर्षाची सुभद्रा
फळ 👉 मने इच्छा प्राप्ती.

🔹देवी भागवतात प्रत्येक वारी कोणता नैवैद्य दाखवावा ते सांगितले आहे ते असे 👉
१ रविवारी ..पायस (खिर)
२ सोमवारी .. शुध्द तुप
३ मंगळवारी ..केळी
४ बुधवारी .. लोणी
५ गुरूवारी .. खडीसाखर
६ शुक्रवारी ..साखर
७ शनिवारी ..साजूक तुप.

🔹 बर्याच ठिकाणी सप्तशती पाठ करण्याची पध्दत आहे ते कोणत्या कार्यासाठी किती करावेत ते असे 👉
▪️फल सिद्धी साठी .. १ पाठ
▪️उपद्रव शांती साठी .. ३ पाठ
▪️भयमुक्ती साठी …७ पाठ
▪️यज्ञफल प्राप्ती साठी .९ पाठ
▪️राज्य प्राप्ती साठी .. ११ पाठ
▪️कार्य सिद्धी साठी .. १२ पाठ
▪️सुख संपत्ती साठी …१५ पाठ
▪️बंध मुक्ती साठी .. २५ पाठ
▪️प्रियव्यक्ती प्राप्ती … १८ पाठ
▪️अनिष्ट ग्रह निवारण .. २० पाठ
▪️शत्रू, राजा,रोग,भय .. १७ पाठ
▪️पुत्र ,धन प्राप्ती साठी ..१६ पाठ
▪️एखाद्याला वश करणे .. १४ पाठ
▪️सामान्यतः सर्व प्रकारच्या
शांती साठी .. … …५ पाठ

🔹नवरात्रात कोणते रंग परिधान करावेत याला धर्मशास्त्रात कुठलाही आधार नाही व उल्लेखही नाही
कारखानदार,दुकानदार,मिडीयावाले यांचे हे जाहिरातीचे फंडे आहेत तरीही स्री भावनांचा आदर म्हणून तसे रंग देत आहे 👇
रविवार … केशरी ,अबोली
सोमवार .. पांढरा
मंगळवार.. लाल, डाळिंबी
बुधवार … निळा, आकाशी
गुरूवार .. पिवळा
शुक्रवार … हिरवा,पिस्ता, शेवाळी
शनीवार…..जांभळा ,करडा (ग्रे )
रविवार …..केशरी ,अबोली
सोमवार… .मोरपंखी
मंगळवारी …गुलाबी

🔹नवरात्र बसविल्यावर समजा घरात सुतक/ अशौच /वृध्दी आली तर सप्तशती पाठ थांबवून सुतक संपल्यानंतर राहिलेले पाठ पुर्ण करावेत मात्र नवरात्र उपवास चालू ठेवावेत व माळ/दिवा इत्यादी शेजारच्यांकडून अथवा ब्राम्हणाकडून, लांबचे नातेवाईकांकडून करावे आणि घरातील साहित्य वापरू नये.

🔹नवरात्रीच्या आधीच असा प्रसंग आला तर मात्र १३ वा /१५वा झाल्यावर उरलेल्या दिवशी नवरात्र बसवता येईल जसे …७|५|३ व १ दिवसाचे बसवता येईल त्या नवरात्राला……सप्तरात्रौत्सव ( ७ दिवसांचे)..पंचरात्रौत्सव ( ५ दिवसांचे) त्रिरात्रौत्सव ( ३ दिवसांचे)
एक रात्रौत्सव (१ दिवसाचे) अशा पध्दतीने करता येईल तसे दिवस मोजून कसे बसवता येईल ते बघावे.

🔱 माहिती आवडली तर इतराना शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कळवा. कारण तुमची एक प्रतिक्रिया म्हणजे माझा उत्साह आहे

🚩नवरात्री साठी हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद 👏👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news