नवरात्र विशेष भक्ताच्या हाकेला धावून तारणारी चंडीका माता !

ढगा देवी नवरात्र उत्सव प्रारंभ
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
बोरगाव मंजू संजय तायडे – अकोला तालुक्यातील कुरणखेड हे गाव याच गावाच्या बस स्थानकापासून दक्षिणेस काटेपुर्णा नदीच्या काठावर हाकेच्या अंतरावर उंच टेकडीवर हिरवळ वृक्षांच्या छायेत ढगा देवी नवरात्र उत्सव साजरा होत आहे, येथे चंडिका मातेचे मंदिर आहे , प्राचीन काळापासून पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात व विदर्भातही ओळखले जाते हेच तीर्थस्थान भाविकांचे श्रद्धास्थान , भक्त संकटात सापडला तर हाकेला धावून जाणारी माता चंडिका धाऊन येते अशी भक्तांची धारणा आहे, चंडिका मातेच्या बहुतांश कथा व एक सुवर्ण इतिहास आहे, कुरणखेड सह ढगा देवी प्रचलित नाव लौकीक झाले , भक्ताच्या हाकेला व नवसाला पावणारी व संकटात तारणारी माता, प्राचीन काळी टेकडीवर घनदाट अरण्यात निर्मनुष्य मातेचे वास्तव्य होते , प्राचीन काळापासून चंडिका मातेच्या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली गेली असावी असा भाविकांचा विश्वास आहे या मंदिराचा सुवर्ण इतिहास दोनशे वर्षाचा असावा असा मानस आहे, आज हेच ठिकाण तिर्थक्षेत्र म्हणून उदयास आले, याच प्रकारचे मंदिर ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे असल्याचे अभ्यासक सांगतात आद्य पुजारी व्यंकटेश कोंढोबा भोसले यांनी तीस वर्ष सेवा केली, पुढे १९ ९२ /९३ सालात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला ,मंदिराच्या पायथ्याशी टेकडी, सभामंडप , भव्य मंदिर उभे केले, अश्विन व चैत्र महिन्यात नवरात्रात येथे हजारो भक्तांची मांदियाळी असते , दैनंदिन धार्मिक उत्सव रेलचेल राहते, मंदिराच्या उत्तरेस पायऱ्या, प्रवेशद्वाराजवळ भैरवजी महाराज कुंड , गोरक्षण संस्था, आसरा माता मंदिर , हनुमान मंदिर, दुमजली भक्त निवास ,भोजन सभागृह आज दृष्टीस येते , मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण टेकडीवर वृक्षांच्या गळ्यात मातेचे मंदिर पायथ्याशी उत्तरेकडे वाहणारी काटेपूर्णा नदी, निसर्गरम्य वातावरणात भक्त तल्लीन होतात , नवरात्र उत्सवा दरम्यान नऊ दिवस मातेची पूजाअर्चा सहपरिवार भक्तीमय होऊन भक्त तल्लीन होतात, हे विशेष