दि. १८ ऑक्टो. ला अकोला जिल्हा वंचित बहुजन युवा वतीने आघाडी “भव्य इशारा मोर्चा”

दि. १८ ऑक्टो. ला अकोला जिल्हा वंचित बहुजन युवा वतीने आघाडी “भव्य इशारा मोर्चा”

नोकर भरतीचे खाजगीकरण, पेपरफुटी विरुद्ध कायदा, जादा परीक्षा शुल्क, शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा खाजगकरण व शाळा दत्तक, समुह शाळा ह्या विरोधात अकोल्यातील तरुणाईचा एल्गार .शास्त्री स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. दि. १८ ऑक्टो. २०२३, सकाळी १० वा. सम्यक आंदोलन प्रमुख प्रा. अंजलीताई आंबेडकर, ह्यांचे नेतृत्त्वात”भव्य इशारा मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे.प्रमुख उपस्थिती राजेंद्र पातोडे
युवा आघाडी प्रदेश महासचिव प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर प्रदेश उपाध्यक्ष
अरुंधती शिरसाट,महीला आघाडी प्रदेश महासचिव बालमुकुंद भिरड, विभागीय महासचिव सरकारने केलेले जाचक नियम रद्द करून आपल्या भवितव्य आणि शिक्षण अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सुशिक्षित तरुण तरुणी, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, शिक्षक पालक, संस्था चालक व संघटना ह्यांनी सहभागी व्हावे हि विनंती.
प्रमुख मागण्या :

१. कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तात्काळ रद्द करावा व सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करण्यात यावे.वाढीव फी रद्द करण्यात यावी.

२. स्पर्धा परिक्षेसाठी राजस्थानच्या धर्तीवर एकच परिक्षा शुल्क (OTR) आकारण्यात यावे.तसेच ह्या परीक्षा लोक सेवा आयोगा मार्फत घेण्यात याव्यात.

३. जि.प.शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा.

४. सर्व शासकिय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर तातडीने करण्यात यावी.

५. राज्यसेवा व सरळसेवा पदभरती MPSC च्या मार्फत करण्या साठी आयोगाला अध्यक्ष व इतर अधिकारी मोठ्या संख्येत नियुक्त करावे.

६. पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा.त्यात अजामीनपात्र व राज्याचे विरुद्ध द्रोह केल्याचे कलम समाविष्ट करावे.

७. KG to PG सर्वांना मोफत शिक्षण मिळावे.शिक्षणाचे खाजगीकरण तातडीने थांबवावे.

८. केंद्र राज्य सरकारच्या विविध परिक्षांसाठी तालुका स्तरावर परिक्षाकेंद्र सुरु करावे.

९. शिक्षण हक्क कायद्यानुसार
१ ली ते १० वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण करून ह्या आधी शिक्षण दिलेल्या शाळांची थकित संपूर्ण रक्कम अदा करावी.

१०. प्रलंबीत शिष्यवृत्ती आणि स्वाधारचा निधी तात्काळ वितरीत करावख तसेच महागाई
निर्देशांकानुसार त्यात वाढ करावी.

११. शासकिय वस्तीगृहातील भत्ता १५०० रु व स्टेशनरीमध्ये वाढ करावी.

१२. शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा दत्तक देणे बाबतीत केलेले बेकायदा नियम रद्द करण्यात यावे. विविध मागण्यांसाठी इशारा मोर्चा आयोजन करण्यात आले आहे.

अशी माहिती धीरज इंगळ जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन श्रीकांत घोगरे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी आशिष मांगुळकर अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी,महानगर, पश्चिम.जय तायडे अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी, महानगर, पूर्व.राजकुमार दामोदर महासचिव, वंचित युवा आघाडी.कुणाल राऊत महासचिव, वंचित युवा आघाडी. आशिष गिरी महासचिव, वंचित युवा आघाडी सर्व पदाधिकारी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा महानगर यांनी इशारा दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news