महानगरात वंचितच संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा
वंचित आघाडी महानगर कार्यकारिणी बैठक संपन्न
अकोला – स्थानिक शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने अकोला महानगर पश्चिमची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अकोला शहरातील प्रत्येक प्रभागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. तसेच नवनियुक्त महानगर कार्याध्यक्ष मजहर खान चाॅंद खान, महानगर महासचिव माजी नगरसेवक गजानन गवई, महानगर उपाध्यक्ष सै अलीमुद्दीन सै निजामुद्दीन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महानगर कार्याध्यक्ष मजर खान, महानगर महासचिव गजानन गवई, उपाध्यक्ष सय्यद अलीमुद्दीन, मनोहर पंचवानी, जुनेद मंजर साहब, शाहिद भाई, अक्रम कुरेशी, अन्वर भाई शेरा यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे सुत्रसंचालन महानगर प्रवक्ता रणजीत वाघ यांनी केल. प्रास्ताविक गजानन दांडगे यांनी तर आभार प्रदर्शन मनोज शिरसाट यांनी केले. लवकरच विस्तारीत कार्यकारिणीची निवड करण्यासाठी प्रत्येक प्रभागात संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीला रऊफ पैलवान, सुरेश कलोरे, हर्षद खान, जाहिद खान, साजिद खान लोहा बाजारवाले, सुजित तेलगोटे, कृष्णा घाटोळ, अहमद खान अयुब खान, सय्यद कौसर अली, मोहम्मद जाबीर, साबीर खान, फिरोज लालू गोरवे, शेख कंमरू, अनिस इकबाल भाई, स्वप्निल शिरसाट, साहिल वाघमारे, विश्वदीप शिरसाट, अरविंद शिरसाट, संदेश तायडे, बिल्लू हाजी सय्यद मोसिन, सोहेल खान मज्जित खान, अजय तायडे, मंगेश बलखंडे, अनिस भाई, राजेश गोपनारायण, प्रवीण डोंगरे, महेंद्र डोंगरे, दीपक गोपनारायण, विनोद इंगळे, मिलिंद आकोले, राजेभाऊ शिरसाट, सुभाष तायडे, पुरुषोत्तम अहिर, लखन घाटोळे, मयूर वाकोडे, रोशन शिरसाट, विश्वदीप तायडे, विजय हिवराळे यांच्यासह अकोला महानगर पश्चिम मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.