“स्थानीक गुन्हे शाखा अकोला, ची धडाकेबाज कारवाई पोलीस ठाणे ओसीवारा, बृहमुंबई येथे करोडो रूपयाची चाेरी करणाऱ्याआरोपीस अकोल्यात केले जेरबंद, त्याचे कडून गुन्ह्यातील ३६,५०,०००/- रू ची रोख रक्कम जप्त “
दिनांक- १३/१०/२०२३.
दिनांक १३/१०/२०२३ रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला चे पो. नि. श्री. शंकर शेळके, सोबत सपोनि. कैलास डी. भगत हे पो. स्टे रामदासपेठ येथे चोरींच्या गुन्हयाचे तपासात हजर असतांना, मा. पोलीस अधीक्षक, साहेब अकोला यांनी माहीती देवून आदेशीत केले की, पोलीस ठाणे ओसीवारा बृहमुंबई येथील करोडो रूपयाची चोरी झालेल्या गुन्हयात सहभागी असलेला आरोपी नामे संतोष चव्हाण हा त्याचे सोबत त्या गुन्हयातील काही रोख रक्कम घेवून पसार झाला असून, तो सध्या अकोला येथे असल्याची गोपनिय माहीती मिळाली. त्याचा अकोला शहरात शोध घेवून त्याचे कडील रोख रक्कम सह त्यास ताब्यात घेवुन कायदेशीर कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक साहेबांनी आदेशीत केले असता. पो. नि. श्री. शंकर शेळके यांनी आरोपीचा अकोला शहरात गोपनिय बातमीदार व तांत्रीक माहितीच्या आधारे शोध घेवून त्यास तात्काळ रोख रक्कम सह ताब्यात घेणे करीता, स्वःता स्थागुशा प्रमुख श्री. शंकार शेळके, सपोनि. श्री. कैलास डी. भगत व स्थागुशा येथील अमंलदार यांनी दोन पथके तयार केले.
तांत्रीक माहीतीच्या आधारे व गुप्त बातीमदारा मार्फत पो. ठाणे ओसीवारा, बृहमुंबई येथील गुन्हयातील आरोपी हा पो.स्टे सिव्हील लाईन हद्दीतील क्रांती चौक, न्यु तापडीया नगर अकोला या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली त्या ठिकाणी स्थागुशा, पथकाने जावून कौशल्यपूर्ण पध्दतीने संशयीत आरोपी नामे संतोष सुदमा चव्हाण रा. तेजश्री अपार्टमेंट रूम नं. १०६ घनसोली नवी मुंबई याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्यास सविस्तर विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचे कडून गुन्हयातील चोरलेल्या रक्कम पैकी गुन्ह्यातील नगदी ३६,५०,०००/- रू जप्त केली आहे. स्थागुशा, अकोला यांनी अश्या प्रकारे मुंबई येथील आरोपीस कौशल्यपूर्ण पध्दतीने ताब्यात घेवून त्यावे कडून मोठी रक्कम जप्त केली आहे. मागिल दोन महिण्यातील स्थागुशा, अकोला वी गुन्हयामधील चोरीस गेलेल्या रक्कमे पैकी ३५ लाखापेक्षा जास्त रक्कम जप्त करण्याची ही दुसरी घटना आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवून त्यास पो. ठाणे ओसीवारा बृहमुंबई येथील पोलीस अधीकारी अकोला येथे रक्कमेसह ताब्यात देण्यात आले आहे. सदर अटक मोहीम ही दिनांक १३/१०/२३ चे २३:०० ते दिनांक १४/१० / २३ चे सकाळी ०८:०० वा पावेतो शुरू होती.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. संदीप घुगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब उप.वि.पो.अ. श्री. सुभाष दुधगावकर, पो. नि. श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे सपोनि. श्री कैलास भगत, पो. हवा. रवी खंडारे, पो.ना, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकुल चव्हाण, खुशाल नेमाडे, एजाज अहेमद, विशाल मोरे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, चालक अक्षय बोबडे पो. अं अमोल दिपके, एस. डी. पी.ओ. ऑफिस चे राज चंदेल, नदीम शेख, तसेच, सायबर सेल चे आशिष आमले यांनी केली आहे.