पालकमंत्र्यांनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन
अकोला, दि. १५ : राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वराचे दर्शन घेतले.
आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार व अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री राजराजेश्वर परिसर पर्यटनस्थळ स्थळ घोषित करण्याच्या मागणीची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. याबाबत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. मंदिर परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. संस्थानच्या वतीने पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. ऍड. गिरीश देशपांडे, चंद्रकांत सावजी, गजानन घोंगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.