पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून काटेपूर्णा प्रकल्पाची पाहणी पर्यटन विकासासाठी प्रस्ताव द्यावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अकोला, दि. १५ : महान येथील काटेपूर्णा प्रकल्प परिसरामध्ये पर्यटन सुविधा विकसित करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावा, असे आदेश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.
पालकमंत्र्यांनी महान येथे भेट देऊन काटेपूर्णा प्रकल्पाची पाहणी केली. आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल वसुलकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी प्रकल्पाची पाहणी करून पाणीपुरवठा व इतर विविध बाबींची माहिती घेतली. लोकप्रतिनिधीशी चर्चा करून त्यांनी जिल्ह्यात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा यंत्रणा, तसेच प्रकल्पावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.
प्रकल्पाच्या ठिकाणी उद्यान विकास, आवश्यक निधी,
नियमित वीजपुरवठ्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
०००