पत्नी व प्रियकराने केली पतीची निर्घृण हत्या ! पोलीसांनी फिरवली तपासाची चक्रे, दोन आरोपी अटकेत

पत्नी व प्रियकराने केली पतीची निर्घृण हत्या ! पोलीसांनी फिरवली तपासाची चक्रे, दोन आरोपी अटकेत

अकोला: अकोट फैल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कास्तकार ढाब्याजवळील उगवा शेतशिवारात निघृण खून करण्यात आलेल्या इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता असून याप्रकरणी आकोट फाईल पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत काल काही तासातच या प्रकरणातील दोन आरोपीना अटक केली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

१२ ऑक्टोबर रोजी ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मृत व्यक्ती कृषी नगरातील भीम नगर येथील विद्यावान प्रधान आहे.मृतक दहा ते पंधरा दिवसांपासून बेपत्ता होता.कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलेल्या इसमाचीं आत्महत्या नसून, त्याची जड वस्तूने डोक्यावर व मणक्यावर मारहाण करून हत्या केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

 

तपासणी अहवालानुसार इसमाच्या डोक्याचा अर्धा भाग तुटलेल्या अवस्थेत आढळून आला होता.हात- पाय तोडलेले असल्याचे तपासणीच्या अहवालात स्पष्ट होत आहे.पीएसआय फुलउंबरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपीना अटक केली आहे.कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे, एसडीपीओ सुभाष दूधगावकर,अकोट फाईलचे पोलीस स्टेशन ठाणेदार चंद्रशेखर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जायभाये,पीएसआय राहुल ठेवणे, पीएसआय फुल उंबरकर,डीपी पार्टी कर्मचारी,पो हवा जितेंद्र काटखेडे,पो हवा संतोष चिंचोळकर ,प्रशांत इंगळे ,पो का असलम शहा ,गिरीश तिडके,इमरान शाहा यानी केला.

पत्नी आणि प्रियकराने केली हत्या

ही हत्या मृतक विद्यावान बळीराम प्रधानची पत्नी व तिचा प्रियकर आरोपी लकीने घडवून आणली असून प्रियकर आरोपी लकीसोबतचे अनैतिक संबंध कायम ठेवण्यासाठी आरोपी पत्नीने तिच्या पतीचा खून केला असल्याची माहिती आहे.

या प्रकरणातील आरोपी लकी तेलंते वय २४ वर्ष रा. मोठी उमरी व कुंकूला विद्यवान प्रधान वय ४० वर्ष रा शिवणी अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news