बाळापुर शहरांत कंत्राटदाराने मजुरांचे पगार न दिल्यामुळे मजूर गेले संपावर.

बाळापुर शहरांत कंत्राटदाराने मजुरांचे पगार न दिल्यामुळे मजूर गेले संपावर.

 

अँकरः केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी सक्षमपणे करता यावी आणि शहरातील घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नगर परिषदेचा वतीने महिन्याला लाखो रुपये खर्च करण्यास सुरुवात केली. कचरा गोळा करण्यासाठी वाशीम येथील कुमुदिनी रिसोर्स मँनेजमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नवीन ठेकेदारांची नियुक्ती करून कचरा वाहतुकीसाठी गाड्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, कंत्राटदाराने मजुरांचे पगार न दिल्यामुळे तीन-ते चार दिवसांपासून मजूर संपावर गेले आहेत त्यामुळे बाळापुर शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहे नवरात्र उत्सवात स्वच्छतेला महत्व असतांना बाळापूर शहर अस्वच्छ दिसून येत आहे परिणामी ठेकेदाराच्या चुकीच्या कारभारामुळे शहरात स्वच्छ भारत अभियानाचे ‘तीन तेरा’ वाजल्याचे दिसत आहे.

 

व्हाँईसः स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत ‘घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६’ नुसार कचऱ्याचे ओला, सुका व घरगुती घातक कचरा असे वर्गीकरण करून त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत.

 

एसएचएस 2023 ची संकल्पना “कचरा मुक्त भारत” आहे. एसएचएस -2023 मध्‍ये स्वयंसेवा आणि श्रमदानाच्या भावनेने काम करण्‍यात येणार आहे. तसेच सफाईमित्रांच्या कल्याणासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छतेचा उच्च दर्जा प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्‍याचे सांगीतले आहे. परंतु वाशिम येथील कुमुदिनी रिसोर्स मँनेजमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कंत्राटदारावर लोकप्रतिनिधींचे आशीर्वाद असल्यामुळेच

 

हा कंत्राटदार मजुरांच्या पगाराची अडवणूक करून स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना वेठीस धरले आहे.तसेच नवराञ उत्सवांत बाळादेवी मंदीर येथे गर्दी असते तसेच या ठिकाणी सकाळीच भावीक भक्त दर्शनासाठी जात असता परंतु या रोडने एवढे मोठे कचराचे ढिग सुध्दा पडले तसेच शहरातील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळजवळ,सुध्दा कचराचे ढीग पडले असुन साफसफाई साठी मजुर सुध्दा नाही ऐन,नवराञ उत्सवाच्या तोंडावरच कंञातदारने मजुराचे पगार न दिल्यामुळे मजुर संपावर जाऊन शहरात स्वच्छता अभियानचे तीन तेरा वाजल्याचे दिसुन येत आहे. याबाबत नागरीक सुध्दा कंञाटदारबाबत रोष व्यक्त करत आहे.

प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news