भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळाअनेक वर्षांच्या लढ्याला यश अकोला समता परिषदेने केला जल्लोष
======================
अकोला :- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा पुणे येथील भिडे वाड्यात १९४८ला सुरू केली होती. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे शासनाने तथा पुणे महानगरपालिकेने नियोजन केले होते. परंतु काही भाडे करू न्यायालयात गेल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता परंतु आज उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने पर्यायाने राज्य सरकारने जिंकला आहे. माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचे अकोल्याच्या समता परिषद च्या वतीने ढोल ताशा च्या गजरात, फटाक्याची आतिषबाजी करून तथा नागरिकांना पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले.भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक करण्याचा प्रश्न सुटला असून तिथे तातडीने काम सुरू होईल,या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल. यासाठी महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक छगनरावजी भुजबळ यांनी आटोकाट प्रयत्न केले. आज न्यायालयाच्या निकालाचे वृत्त अकोल्यात कळताच अ भा. महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा तुकाराम बिडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक अग्रेसन चौक येथे सावित्रीबाई फुले विद्यालयाजवळ मा. न्यायालयाच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.प्रा सदाशिव शेळके, प्रा श्रीराम पालकर, सौ राधाताई बिडकर, सौ. जोती निखाडे. कु. कल्पना गवारगुरु, प्रा विजय उजवणे, शत्रुघ्न बिडकर, अनिल मालगे, रामदास खंडारे, यश सावल,यांच्या नेतृत्वात स्थानिक सावित्रीबाई फुले विद्यालय अग्रेसन चौक अकोला येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. ऊपस्थितानी मा. भुजबळ साहेबांसह भिडे वाड्याच्या लढ्यात सहभागी सर्व सामाजिक संघटनेचे आभार मानले आहे.या वेळी बळीराम झांबरे, प्रा दिलीप अरप्तुकर,श्रीकांत ढगेकर, प्रा. प्रफुल्ल देशमुख,सुभाष वाईनदेशकर, अनिल मालगे, चक्रधर राऊत, सौ नेहा राऊत, अक्षय ढोणे, रीना तायडे, सुरेखाताई शिरसाट, गजानन गायकवाड, राहुल गायकवाड, हरिओम राखोडे, व समता परिषदेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.