करतवाडी रेल्वे स्टेशनला थांबा द्या..! केलेल्या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व लोकप्रतिनिधीनी घेतली दखल..
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील सर्व ४० गावांमध्ये करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांब देण्यात यावा या मागणी करिता स्वाक्षरी अभियान सप्ताह महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती पासून तर 8 ऑक्टोंबर 2023 पर्यंत संपूर्ण परिसरात गावागावात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले या अभिमानामध्ये गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपली सही व सहभाग नोंदवावीत आहेत या मागणीला गावागावात प्रचंड प्रतिसाद दिला.हे अभियान समाजसेवक तथा रयत शेतकरी संघटना विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष करतवाडी रेल्वे बचाव कृती समिती समन्वयक ,पुर्णाजी खोडके यांच्या नेतृत्वात परिसरातील गावकरी व निर्भय बनो जनआंदोलनाच्या वतीने राबवले. तसेच गावागावातील शेतकरी युवक महिला मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविता आहे.
चोहोट्टा बाजार हि जवळपास चाळीस खेड्यातील लोकांची मुख्य बाजारपेठ आहे. दैनंदिन कामकाजासाठी दररोज या खेड्यातील लोकांना जाणे येणे करावे लागते याकरिता हा थांबा महत्वाचा आहे. करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांबा देण्यात यावा या आधी या स्टेशनला रेल्वे थांबत होती .परंतु रेल्वे विभागाने सदर थांबा कोणत्या कारणास्तव बंद का केला? व हा थांबा पुन्हा सुरू करण्यात यावा असा मागणीचे निवेदन केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अकोल्याचे खासदार माजी मंत्री संजय धोत्रे साहेब, आमदार रणधीर सावरकर साहेब, विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, DRM मॅडम नांदेड रेल्वे विभाग यांना दिले आहे. या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना सूचना दिली आहेत, तसेच अकोला खासदार संजय धोत्रे साहेब यांनी लगेच रेल्वे विभागाकडे पत्र व्यवहार करून हा थांबा देण्याविषयी सूचना दिली आहेत. तसेच रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा या मागणीला पाठिंबा देऊन लवकरात लवकर हा थांबा देण्याविषयी आश्वासन दिले आहे या मागणीला मनसे चेॲड नंदकिशोर शेळके राज्य सरचिटणीस मनसे जनहित कक्ष व विधी विभाग महाराष्ट्र राज्य यांनी परिसरातील अनेक व्यावसायिक, विद्यार्थी, स्थानीक नागरिकांच्या विनंती वरून दक्षिण मध्य रेल्वे प्रबंधक श्रीमती निधी सरकार यांचेशी संपर्क साधला आणि चर्चा केली व पुर्णाजी खोडके यांच्या मागणीची दखल घेऊन निवेदन देऊन DRM यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे..हा थांबा कधी चालू होतो याकडे करतवाडी स्टेशनच्या परिसरातील गावकरी नागरिकांचे लक्ष लागलेले आहे…..