अकोल्यात लोकसभा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच राजकारण तापलं….
अकोल्यात लोकसभा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच राजकारण तापलं आहे. काँग्रेस सरचिटणीस आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवांमध्ये खडाजंगी झाली. येणाऱ्या लोकसभेमध्ये पॅराशुट उमेदवार उभा करू नका यासाठी गेल्या अनेक दिवसापासून पक्षश्रेष्ठींकडे चर्चा सुरु होती. त्यावर आज काँग्रेसने बोलावलेल्या पत्रकार परिषद नंतर काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर अभय पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव मदन भरगड यांच्यामध्ये खडाजंगी झाली. पत्रकारांनी यामध्ये मध्यस्थी केल्याने प्रकरण झाले. पण या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी चुप्पी साधली आहे. त्यांच्या समोरच हा सर्व प्रकार झाल्यानंतर मला काहीच माहीत नाही, अशी भूमिका त्यांनी माध्यमांसमोर मांडली.