विघ्नहर्ता आर्ट क्लासेस तर्फे नवदुर्गापोस्टर व रांगोळी प्रदर्शनी
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
आज दिनांक 17/10/2023 रोजी विघ्नहर्ता आर्ट क्लासेस तर्फे हिवरखेड येथे आयोजित नवदुर्गा उत्सवात मुलींच्या कला गुणाला वाव मिळावा म्हणून आर्ट शिक्षक वैभव पोटे यांनी प्रदर्शनीचे आयोजन केले असता विद्यार्थिनींनी या मध्ये भाग घेत प्रदर्शनी मध्ये उत्कृष्ट अशा मनमोहक आपल्या हस्त कलेने पोस्टर व पोट्रेट रांगोळी प्रदर्शनीला गावातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला प्रदर्शनी ला आकर्षित अशी सुंदर रांगोळी व विद्यार्थ्यांनी केलेले नवदुर्गांचे जल रंगांमध्ये चित्र हे विशेष आकर्षण या प्रदर्शनी मध्ये पाहण्यास मिळाले कलाशिक्षक वैभव पोटे कलाशिक्षिका ऋतुजा पोटे आणि श्रृती अग्रवाल .आरती भगत.अंजली अस्वार. वृषाली भगत. भक्ती लाखोटिया. सरोज वर्मा .सेजल अढाऊ. आरती बेलूरकार या विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते .