कृषी उत्त्पन्न बाजार समिती पातूर येथे सोयाबीन खरेदी शुभारंभ
आठवडयातून होणार दोन दिवस खरेदी
पातूर कृषी उत्त्पन्न बाजार समिती चे सभापती उपसभापती संचालक मंडळ यांनी आठवड्यातू दोन दिवसखरेदी विक्री वेव्हार सुरु करणे बाबत निर्णय घेण्यात आला आहे .
आता मुख्य बाजार पातूर येथे शनिवार बरोबरच बुधवार ला सुद्धा बाजार सुरु राहणार आहे. जेणे करून शेतकरी बांधवाना शेतमाल विक्री करिता बाहेर गावी जावे लागणार नाही.
आज दि 18/10/2023 रोज बुधवार ला मुख्य बाजार पातूर येथे सोयाबीन खरेदी चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी समितीचे संचालक श्री .चंद्र्कांत अंधार व श्री राजेश महल्ले यांनी शेतकरी याना हार व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी समितीचे प्र.सचिव किरण तायडे व कर्मचारी यांच्या सह दौलतराव घुगे ,अर्जुन टप्पे , ज्ञानेश्वर गोमासे, विलास तायडे, वसंता गोमासे,सीताराम येनकर , रवी करावा , प्रदीप शेवलकार , मो याकूब , कार्तिक कावळे, किरण टप्पे , जुबेर खान , निलेश पाचपोर , निलेश पवार , रवी ठाकरे , व शेतकरी व हमाल बांधव उपास्थीस होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा