अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. अकोला बसस्थानकावरील घटना
ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
अकोला नवीन बस स्थानक क्रमांक २ येथे दिनांक १० ऑक्टोबर रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता,बस स्थानक पोलिस चौकी येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला होता, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ सह मृतदेहाचा पंचनामा केला असता सदर महिला अनोळखी वय अंदाजे 52 मजबूत बांधा,काळा सावळा रंग, उंची ५.५ ,बाॅप कट, उजव्या हाताला अस्पष्ट गोदंलेले या पलीकडे सदर मृतदेहाची ओळख पटेल असे घटनास्थळी काहीही मिळुन आले नाही, दरम्यान दिनांक 10 ऑक्टोबर पासून गत दहा दिवसांपासून सदर अनोळखी मृत महिलेची ओळख पटली नाही, दरम्यान सदर अनोळखी मृत महिला कुणाची नातेवाईक, किंवा ओळखीची असेल तर सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन ठाणेदार प्रदिप सिरस्कार, हेडकॉन्स्टेबल दिलीप हिंगणकर सह पोलीस प्रशासनाने केले आहे पोलिसांनी पोलिस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार प्रदिप सिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दिलीप हिंगणकर सह पोलीस करीत आहेत