ब्रेकींग… तलावात बुडालेल्या ईसमाचा गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने अखेर मृतदेह काढला शोधून.

ब्रेकींग… तलावात बुडालेल्या ईसमाचा गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने अखेर मृतदेह काढला शोधून.

▶️ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर,शाखा मंगरूळपीर यांची धाडसी कामगीरी

घटनास्थळ चमेली धरण वरुड ता.मंगरूळपीर जि.वाशिम

✍🏼 मिळालेल्या माहितीनुसार मंगरूळपीर पोलीस ठाण्यातील हे.काॅ.अमोल मुंदे यांनी वरुड जवळील आज सकाळी अंदाजे दहा वाजताच्या दरम्यान धरणात एक जण बुडाल्याची माहीती पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करिता पाचारण केले.याची माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांना देऊन लगेचच आपले मंगरूळपीर शाखेचे सहकारी
अतुल उमाळे,गोपाल गिरे, लखन खोडे,प्रदीप बुदे,अभय गिरी,यांना घटनास्थळी पाचारण केले क्षणाचाही विलंब न करता सर्च ऑपरेशन चालु केले असता एका तासात धरणातील मृतदेह आज दुपारी 1:00 वाजता शोधून बाहेर काढला यावेळी मृतदेह हा सतीश गणेशराव सुरडकर वय अंदाजे (30) वर्ष रा.शहापुर ता.मंगरूळपीर जि.वाशिम यांचा असल्याचे निष्पन्न झाले यावेळी मंगरूळपीर चे
पिएसआय शंकरराव ढगे सर हे.काॅ.अमोल मुंदे साहेब, पो.काॅ.मोह्हम्मद परसुवाले हे आणी नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news