अकोट शहर वंचितच्या मध्यस्थीने साफसफाई कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या आमरण उपोषणाची सांगता
अकोट प्रतिनिधी
अकोट नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागणी संदर्भात १६ सप्टेंबर पासून संघटनेचे पदाधिकारी यांनी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिपक रामदासजी बोडखे यांनी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या सूचनेप्रमाणे, उपोषणकर्त्यांना भेट दिली. व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तदनंतर मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा केली, मुख्याधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन, त्यांच्या मागण्या मान्य करीत लेखी स्वरुपात आश्वासन देऊन आमरण उपोषणाची सांगता केली. उपोषण करते संघटनेचे राधेश्यामजी मर्दाने, लक्ष्मीनारायण महातो यांनी उपोषण मागे घेतले. वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिपक बोडखे, सुनील अंबळकर, संजय आठवले, न. प.चे कर्मचारी पोहरकर, गोतरकर, ठेलकर, ऋषिकेश तायडे , विशाल आग्रे जम्मू पटेल, दिनेश घोडेस्वार, दिवाकर गवई, वहीद पठाण, इमरान पठाण, अक्षय तेलगोटे ,विशाल तेलगोटे, अब्दुल रहेमान, नितीन वाघ, प्रशांत नाठे, देवेंद्र माकोडे, सक्सेस लबडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.