बाळापुर तालुक्यातील वाडेगाव पोलीस चौकीतील पोलीस हवालदाराला तीन हजाराची लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला – प्राप्त माहितीनुसार, यातील तक्रारदार यांनी दिनांक १९/१०/२०२३ रोजी ला.प्र. वि. अमरावती घटक अमरावती येथे दिलेल्या लेखी तकारीचे अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे श्री. सुभाष शालीकराम दंदी पोलीस हवालदार, पोलीस चौकी वाडेगांव यांनी तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या एन.सी.क. ७२७ / २०२३ कलम ५०४, ५०६ भादवी अतंर्गत अदखल पात्र गुन्हयामध्ये (१०७/११० सी.आर.पी.सी) अतंर्गत कोणतीही कार्यवाही न करण्याबाबत तडजोडी अंती ३०००/रूपये लाचेची मागणी केली त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान आज दिनांक २०/१०/२०२३ रोजी आरोपी श्री. सुभाष शालीकराम दंदी यांनी तक्रारदार यांचेकडून तडजोडी अंती ३,०००/रुपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच स्विकारली. वरुन नमुद आरोपीविरुध्द पो.स्टे. बाळापूर जि. अकोला येथे गुन्हा नोंद करण्यात आली
सदरची कार्यवाही श्री. मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. देविदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती श्री. शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, श्री मिलींदकुमार बाहाकार, पोलीस उपअधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस निरीक्षक चित्रा कि. मेसरे, पोलीस निरीक्षक केतन मांजरे, मपोकों चित्रलेखा वानखडे पो. कॉ. आशिष जांभोळे, पो.ना.निलेश मेहेंगे, पो.ना. संजय कोल्हे, चालक पोउपनि प्रदिप बारबुध्दे, पोकों स्वप्नील क्षिरसागर यांनी पार पाडली. नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारा संबंधी तकार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.