काँग्रेस कमिटीच्या प्रेस नंतर डॉ अभय पाटील आणि मदन भरगड यांच्यात शाब्दिक वाद बंदूक काढल्याची चर्चा चुकीची! – नाना गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक , काँग्रेस कमिटी
Anchor : अकोल्यातील सर्किट हाऊसमध्ये 16 तारखेला काँग्रेस कमिटीच्या प्रेस नंतर डॉ अभय पाटील आणि मदन भरगड यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. या वादात दोघांनी टोकाची भूमिका घेतली होती. दरम्यान डॉ अभय पाटील यांनी बंदूक काढल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे अकोल्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर वरिष्ठ पातळीवर याची दखल घेत, काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी पाठवले आहे. चौकशीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. वाद झाला होता पण बंदूक काढल्याची चर्चा चुकीची अस स्पष्ट मत निरीक्षक नाना गावंडे यांनी मांडले.