2 वर्षे वयाची बालिका रेल्वे स्थानकात सोडली बेवारस!
रेल्वे स्टेशन पोलिस आणि चाईल्ड लाईन टीम ने पोहचवले उत्कर्ष शिशु गृहात
निर्दयी माता की पिता?
अकोला. देशात असे अनेक माता पिता आहेत की, त्यांना मूलबाळ होत नाही. त्यातच ज्यांना मुलगी होते आणि त्यांच्या अपेक्षानुसार मुलगा होत नाही म्हणुन मुलीची गर्भातच किंवा गर्भातून बाहेर दुनियेत आल्यावर हत्या करण्यात येते. मात्र आज सकाळी १०वाजे दरम्यान अकोला रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म २ वरुन प्लॅटफॉर्म १वर असलेल्या रेल्वे पोलीस ठाण्याजवळ केवळ २वर्षे वयाची बालिका बेवारस सोडुन एक अज्ञात व्यक्तीनिघून गेला असल्याची बाब सी सी टी व्ही फुटेज तपासल्यावर उघड झाली आहे. ही बालिका रेल्वे पोलीस आणि चाईल्ड लाईन यांनी सगळे सोपस्कार पुर्ण केल्यानंतर आता जिल्हा महीला व बाल सुधारगृहाच्या उत्कर्ष शिशु गृहात पोहचविले आहे. या प्रकारामुळे निर्दयी माता की पिता? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रेल्वे पोलीस कामाला लागले आहेत.
आज सकाळी दहा वाजेदरम्यान एक अज्ञात व्यक्तीने दोन वर्षे वयाच्या मुलीला रेल्वे पोलीस ठाण्यात सोडुन निघुन गेला तो परत आलाच नाही. ती बालिका केवळ दोन वर्षे वयाची असल्याने तिला काही विचारण्याचा प्रयत्न केला तर केवळ रडतेय त्यामुळे विश्वास ठेवावा अशी माहितीची खात्री होत नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर चाईल्ड हेल्प लाईन संस्थेला रेल्वे पोलिसांनी माहिती दिली त्यानंतर एकमेकांच्या मदतीने ही माहिती जिल्हा महीला व बाल कल्याण समिती ला दिल्यानंतर समितीच्या आदेशाने त्या बलिकेची वैद्यकीय तपासणी शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. व जिल्हा महीला व बाल कल्याण समिती अंतर्गत कार्यरत उत्कर्ष शिशु गृहात या बालिकेला ठेवून तिचे निर्दयी माता की पिता? याचा शोध घेण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशन पोलिस कामाला लागले आहेत. अशी माहिती रेल्वे स्टेशन वरील तीक्ष्णगत चाईल्ड लाईन संस्थेचे पदामाकर सदांशिव यांनी दिली आहे.