जैव वैद्यकीय कचरा निर्मुलन कर्मचारी संघटनाचे कर्मचाऱ्यंना तात्काळ कामावर घ्या अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करणार
वॉईज इको केअर अँड फार्माटेक प्रा. लि . खामगांव संचालकाला दिला इशारा.

अकोला. जैव वैद्यकीय कचरा निर्मुलन कर्मचारी संघटना यांनी प्रादेशिक अधिकारि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना १० जुलै २०२३ रोजी पत्र दिले होते की, आमच्या संघटनेच्या सदस्यांना वॉईज इको केअर अँड फार्माटेक प्रा. लि . खामगांव ने बेरोजगार केलें आहे. त्यामूळे त्या जुन्या संस्थेच्या कामगारांना कामावर घ्या या मागणीसाठी गेल्या ६०दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही म्हणुन गेल्या १६ऑक्टोंबर पासून शक्ती खरारे यांनी आमरण उपोषण सुरु केले. आज उपोषणाचा पाचवा दिवस असूनही दखल घेतली गेली नाही. मात्र ऊ बा ठा पक्षाचे जिल्हा प्रमुख यांनी उपोषणकर्ते यांना भेट दिली असता त्यांनी वॉईज इको केअर अँड फार्माटेक प्रा. लि . खामगांवचे संचालक हर्षद हेंडपाटील यांच्याशी संपर्क करून त्या आंदोलक कामगारांना तात्काळ कामावर घ्या अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
सन २०२१मध्ये मनपा अकोलाच्या स्थायी समितीच्या बैठकीत नियमा प्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवून ग्लोबल इको सेव्ह सिस्टीम अमरावतीला २ नोव्हेंबर २०२१रोजी करार करून २०५१ पर्यंत जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्याचे काम दिले होते. मात्र अचानक ३० जून २०२३ रोजी ग्लोबल इको सेव्ह सिस्टीम अमरावती व्यवस्थापन द्वारा १ जुलै २०२३ पासून सेवेतून बंद केल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे परवाना रद्द झाल्याने क्र्रार बदल केले आहे. त्यामुळे अकोल्यात कोरोना काळापासून कार्यरत कामगार बेरोजगार झाले. म्हणुन त्या कामगारांनी आम्हाला कामावर घ्या या मागणीसठी गेल्या २ महिन्यांपूर्वी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते मात्र संबधीत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शक्ती खरारे या कार्यकर्त्याने दिनांक १६ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असुन आज पाचव्या दिवशी आमदार नितिन देशमुख यांनी भेट देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वॉईज इको केअर अँड फार्माटेक प्रा. लि . खामगांवचे संचालक हर्षद हेंडपाटील यांच्याशी संपर्क केला. आणि इशारा दिला आहे. त्यामुळे आज सकाळी अकरा वाजता येऊन उपोषण कर्त्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन कर्मचारी संघटना प्रमुख सचिव महादेव घोसे , उपोषण करते शक्ति खरारे, सौ लता धनखड़, ऋतिक धनखड़, सुरेश घाटे, संतोष घाटे ,नंदगोपाल पांडे, शुबम गवई, महेन्द्र कांबले ,विलास दानेकर निलेश नागरीकर राजेश मिश्रा व. पदाधिकारी उपस्थीत होते.