खदान परिसरात महिलेची हत्या!

अकोला खदान पोलीस स्टेशन हदीत येत असलेल्या हैदरपुरा मशाद परिसरातील बी रफीक खान 40 वर्षीय यामहिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. सदर घटना आज सायंकाळी आठच्या दरम्यान घडली असून. एका व्यक्तीस व त्याच्या पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या हत्याकांडातील एक आरोपी फरार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच
SDPO सुभाष दूधगांवकर, खदान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे . तसेच इतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.