समन्वयातून धार्मिक उत्सव साजरे करुन सामाजिक एकोपा जोपासा ! ठाणेदार मनोज केदारे
संजय तायडे
तालुका प्रतिनिधी सत्य लढा न्यूज
सर्व धर्मांचे सण उत्सव दरम्यान सर्व धर्मातील लोकांनी एकसंघ होऊन समन्वयातून सण उत्सव साजरे करून सामाजिक एकोपा जोपासावा व दुभगलेल्या मनांना एकसंघ करून सण उत्सवाचे महत्त्व समजून एक दुसऱ्यांना समजून उत्सव साजरे करावे असे आवाहन ठाणेदार मनोज केदारे यांनी केले ते स्थानिक बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते, दरम्यान बोरगाव मंजू येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव सह धम्म चक्र प्रवर्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या सभेत बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार मनोज केदारे हे होते तर प्रमुख उपस्थिती दुय्यम ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे,प स सदस्य भरत बोरे आदी उपस्थित होते , दरम्यान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथे कावड यात्रा उत्सव दरम्यान हिंदू, मुस्लिम बांधवांनी सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासत सामाजिक एकोपा निर्माण करुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला होता ,या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते यांना पोलिस प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले,
प्रसंगी उपस्थित शांतता समिती सदस्य , सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींनी आपले विचार व्यक्त करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी असे आवाहन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील खेडकर पत्रकार संघाचे राज्य सचिव संजय वानखडे , पंकज वाडेवाले, ज्ञानेश्वर वानखडे,शेख गणी, आकाश डोंगरे, दादाराव सुलताने, मंगेश निवाने, मुरलीधर भटकर,सागर तायडे, ज्ञामत शहा, सखाराम वानखडे, विठ्ठल महल्ले, डॉ रफिक, सुबोध गवई, रमेश समुद्रे, आदी शांतता समितीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते , नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, आदी उपस्थित होते, सभेचे संचालन एपीआय पुरुषोत्तम ठाकरे यांनी केले,तर संचालन पत्रकार देवानंद मोहोड यांनी केले, यशस्वी करीता हेडकॉन्स्टेबल अरुण गोपनारायण, नारायण आंवटकर, गिरीश विर, शेख इरफान , गजानन लोणकर, उमेश बोबडे,सह पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले,