अनय उर्फ गोल्डी तायडे याची दमदार कामगिरी! राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक बहाल.
संजय तायडे
तालुका प्रतिनिधी सत्य लढा न्यूज
स्थानिक बोरगाव मंजू येथील अनय उर्फ गोल्डी हा तहसीलदार राहुल तायडे यांचा चिरंजीव अकोला येथील प्रभात किड्स डे बोर्डिंग शाळेचा विद्यार्थी असून तो इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे ,अनय उर्फ गोल्डी तायडे याने हैदराबाद येथे मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअरस् भारत सरकारच्या सिबीएससी राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन दिल्ली पब्लिक स्कूल हैदराबाद येथे 18 ते २०ऑक्टोबर या दरम्यान स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत देशभरातून सीबीएससी चे शेकडो खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले होते दरम्यान प्रभात किड्स चे प्रतिनिधीत्व अनय तायडे यांनी केले होते या स्पर्धेत त्याला अकरा वर्षे वयोगटातुन दमदार कामगिरी बजावत सुवर्ण पदक पटकावले , दरम्यान शाळेचे संचालक डॉ गजानन नारे, मुख्याध्यापिका वाघमारे अध्यापिका शुभांगी क्रीडा शिक्षक आशिष बेलोकर यांचे मार्गदर्शन मिळाले तर संत गजानन महाराज जिमनॅस्टिक अकॅडमी खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले होते सहभागी खेळाडू आयांश झांबड,राधिका झांबाड, संचित इंगळे, प्रज्वल चांडक सहभागी झाले होते, तर प्रज्वल चांडक वयोगट १४ उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं , तर यशस्वी खेळाडू कझाकीस्तान येथे आयोजित आशिया एरोबिक्स चंपियन नेतृत्व करतील
विजयी खेळाडू यांना एरोबिक्स फेडरेशन प्रमुख संतोष देशमुख, संतोष खैरनार यांनी हिरवी झेंडी दिली,
खेळाडूंनी यशाचे श्रेय आई वडीला सह जिमनॅस्टिक अकॅडमी संचालक श्रीकात दादा पाटील, प्रशिक्षक राहुल पहुरकर यांना दिले आहे,