गेल्या ३९ वर्षापासून वर्षापासून अकोल्यात साजरा होतो धम्मचक्र दिन दिन!

गेल्या ३९ वर्षापासून वर्षापासून अकोल्यात साजरा होतो धम्मचक्र दिन दिन!

देशातील वंचित बहुजन समाजाला स्वतंत्रपणे स्वाभिमानाने व समृध्द जिवन जगात यावे त्यांना त्यांचे हक्क व न्याय मिळावा म्हणून श्रध्देय अँड. बाळासाहेब आंबेडकर आपल्या कौटुंबिक तथा वैयक्तीत सुखाचा त्याग करून बहुजन समाजाच्या विकासासाठी जिवन समर्पित करीत आहेत.जागृतिचा विस्तव कधीही विझु देवु नका हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश शिरोधार्य मानुन जनजागृतीसाठी निरंतर कष्ट घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अकोला येथे दरवर्षी धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा ६७ वा वर्धापन दिन असला तरी श्रध्देय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सन १९८४ पासून म्हणजे गेल्या ३९ वर्षांपासून अकोला शहरात विजया दशमीच्या दुसऱ्या दिवशी भव्य प्रमाणात साजरा केल्या जातो.देशातील नागरीक हे प्रबुद्ध व्हावे म्हणजेच लोकशाही मानणारे स्वातंत्र्याचा आदर करणारे, सामाजिक न्याय समतेची मुल्य स्विकारणारे व्हावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती ती पुर्ण करण्यासाठी रात्र दिवस बाळासाहेब आंबेडकर झटत आहेत.श्रध्देय बाळासाहेब आबेडकर हे क्रियाशील विचारवंत आहेत. लोकांची त्यांचेवर प्रचंड श्रध्दा आहे. या महोत्सवाला प्रमुख मार्गदर्शक श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जनतेला संबोधीत करीत असतात.

त्यांचे संबोधन म्हणजे समाजासाठी उर्जा असते. प्रेरणा तथा संजीवनी असते. संपूर्ण बहुजन समाज त्यांच्या मागदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतो.भारतीय बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन ह्या सर्व संस्थेच्या विद्यमाने हा भव्य-दिव्य धम्म मेळावा पार पाडल्या जातो.यावर्षी सुध्दा मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे जनसागरामध्ये आनदाचे उधान आले आहे. ग्रामीण भागातील मजुर वर्ग आपल्या मजुरोची परवा न करता मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्स्फुर्तपणे तयारीला लागले आहेत. लेझीम पथक, आखाडे, देखावे, पारंपारीक वाद्य, घोडे, बॅन्ड पथक, समता सैनिक दलाचे पथसंचालन हे मिरवणुकीचे खास आकर्षन असते.अध्देय अँड. बाळासाहेब आंबेडकर सजविलेल्या धम्म रथावर आरुढ होवुन मिरवणुकीचे नेतृत्व करीत असतात शहरामध्ये बाळासाहबाचे ठिकठिकाणी जातीय धर्मांच्या पलिकडे जावुन प्रतिष्ठित मंडळी भव्य प्रमाणात स्वागत करतात.प्रचंड अशी मिरवणुक व भव्य दिव्य धम्म मेळावा शिस्तबध्द पध्दतीने पार पडावा म्हणून २० समित्यांचे गठण करण्यात आले.

प्रत्येक समिती प्रमुखाची नेमणुक करून त्याच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणार अशी खात्री आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शासन, प्रशासन, स्वराज्य स्थानिक संस्था व इतर सेवाभावी संस्था यांचे मोठया प्रामणात सहकार्य मिळत आहे. समाजातील लोक स्वयं प्रेरणेने सहभागी होवुन तन-मन-धनाने सहकार्य करीता आहेत. दि. २५/१०/२०२३ बुधवार रोजी रेल्वे स्टेशनवरुन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शिवाजी कॉलेज, अकोट स्टॅन्ड, मानेक टॉकीज, मंगलदास मार्केट, सिटी कोतवाली, गांधी चौक, बस स्टॅन्ड टावर मार्गे मिरवणुक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर देवुन सायंकाळी ६.०० वाजता धम्म मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे.सदर मेळावा भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आ. पी. जे. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुज्य भंते श्री संघपालजी महाथेरो व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.मुख्य आकर्षण म्हणजे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. बाळासाहेबांचे मार्गदर्शन म्हणजे उर्जा असते, वर्षभरासाठी पुरणारी शिदोरी असते, म्हणून लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत . अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news