बोरगावात सभामंडपाचा लोकार्पण सोहळा थाटात!
संजय तायडे
तालुका प्रतिनिधी सत्य लढा न्यूज नेटवर्क
स्थानिक भिम नगर बुद्ध विहार स्थित अकोला पूर्व आमदार रणधीर सावरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सुसज्ज व भव्य उभारण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला, दरम्यान दहा लक्ष रूपये निधीतून उभारण्यात आलेल्या सुसज्ज , भव्य सभामंडपाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी
आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते सोहळा पार पडला, प्रसंगी या सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सुबोध गवई मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते, दरम्यान रणधिरभाऊ सावरकर यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करुन सन्मानित करण्यात आले, प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र देवर, ग्रामपंचायत सदस्य सुनील खेडकर, ठाणेदार मनोज केदारे, संजय गवई ,लालाजी गवई ,डॉ सचिन दायमा,पंकज वाडेवाले, बंटी मांगे, सागर तायडे अक्षय इंगळे ,पंकज वानखडे.अक्षय बागडे ,सोमेश बागडे ,अभिषेक गवई ,आशुतोष जामनिक, सुमित गवई, अजय हिरोडे प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सह ग्रामस्थ उपस्थित होते, दरम्यान या सोहळ्याच्या यशस्वी करीता सुबोध गवई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहयोग दिले,