स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन चोरीचे गोंवश जनावरे यास निर्दयतेने वागणुक देवुन कत्तली करिता बाळगलेले २,४०,५००/ रु चा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन चोरीचे गोंवश जनावरे यास निर्दयतेने वागणुक देवुन कत्तली करिता बाळगलेले २,४०,५००/ रु चा मुद्देमाल जप्त.

दि. २२/१०/२०२३ रोजी गोपनिय बातमीदाराकडुन मिळाली कि ग्राम वाडेगाव येथील इंदिरा नगर झोपडपट्टी येथे एक इसम गोवंश जातीचे जनावरे चोरून आणुन त्यांना निर्दयतेने वागणुक देवुन कत्तली करिता बाळगुन आहे अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथिल पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा येथील पथकांनी जिल्हयातील पो.स्टे. बाळापुर हद्दीतील ग्राम वाडेगाव येथील इंदिरा नगर झोपडपट्टी मध्ये राहणारा मोहम्मद असद मोहम्मद अशरफ वय २९ वर्ष याचे ताब्यातुन चोरून आणलेले गोवंश जातीचे ०८ जनावरे यास कत्तली करिता निर्दयतेने बांधुन ठेवलेले तसेच कत्तली करिता वापरण्यात आलेले सुरा व कु-हाड यांची एकुण किमंत २,४०,५००/ रुचे मिळुन आल्याने जप्त करून पुढील कारवाई कामी पो.स्टे. बाळापुर अकोला यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. संदिप घुगे सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, जी. पो.उप.नि. गोपीलाल मावळे, ए.एस.आय. दशरथ बोरकर, पोहचा फिरोज खान, गोकुळ चव्हाण, प्रमोद ढोरे, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, उमेश पराये महिला पोहवा तुळसा दुबे, ना.पो.कॉ. खुशाल नेमाडे, पो. कॉ. लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, स्वप्नील खेडकर, स्वप्नील चौधरी, शिवम दुबे, धिरज वानखडे, उदय शुक्ला, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, सतिश पवार महिला पो. कॉ. तृष्णा घुमन व चालक ना. पो. कॉ. शेख नफीस पो. कॉ. अनिल राठोड, अक्षय बोबडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news