बाळापूर येथे धम्म अभियान रथा चे भव्य स्वागत
बाळापूर :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा देहुरोड पुणे येथून धम्म अभियान रथाचे बाळापूर येथे आगमण होत असते बाळापूर शहरात या धम्म अभियान रथाचे बौद्ध बांधव उत्सव समिती, बाळापूर यांच्या वतीने शहरात भव्य स्वागत करण्यात आले.
देहुरोड पुणे येथे परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या मुर्तिची स्थापना केलेली असून त्याच प्रत्यक्ष मुर्तिचे दर्शन धम्म अभियान रथा द्वारे सर्वाना़ व्हावे या करिता देहुरोड पुणे येथून धम्म अभियान रथ नागपूर करिता येत़ असतो ठिकठिकानी रथाचे भ०य स्वागत करण्यात येते
आज सकाळी धम्म अभियान रथाचे बाळापूर शहरात आगमन झाल्या नंतर बौद्ध बांधव उत्सव समिती तसेच बौद्ध बांधव उपासक , उपासिका यांनी धम्म अभियान रथाचे भव्य स्वागत केले व धम्मज्ञाण ग्रहण केले खामगाव नाका येथून धम्म रथाची ढोल ताशे सह भव्य मिरवनूक शहरात दाखल झाली.
यावेळी बुध्द विहार बाळापूर येथे बुध्द वंदना घेण्यात आल्या नंतर प्रा. दि . वा . बागुल यांचे धम्म प्रवचन झाले यावेळी बौद्ध उपासक – उपासिका व लहान बालक – बालिका तसेच समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला