पातूर शहरातील नवरात्री उत्सव मिनी माहूर असलेल्या रेणुका देवी टेकडी पायथ्याशी रोडचे खंडे झाले जिव घेणें
सामाजिक कार्यकर्ते गजानन गाडगे यांच्या आव्हानाला ग्रामपंचायत सरपंच यांचा प्रतिसाद
पातुर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या बाळापूर पातूर रोडलगत असलेल्या मिनी माहूर गड रेणुका देवी टेकडी पायथ्याशी रोडचे खंडे जिव घेणें झाले आहेत दोन दिवस आधी पहाटेच्या देवी आरतीला येणाऱ्या देवी भंक्त दोन मुली यांचा या रोडवरील खड्ड्यामध्ये मोटारसायकल वरून जात असताना अपघात झाला या वेळी दोन्ही तरुणींना डोळ्याला ईजा झाली हा प्रकार उघडकीस आला असता सामाजिक कार्यकर्ते गजानन गाडगे यांनी ग्राम पंचायत सरपंच सौ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली व सौ शिंदे यांनी या वेळी या गोष्टी चे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत च्या माध्यमातून चुरी बोलावून या खंडाचा भरना केला या वेळी सरपंच पती सुधाकर शिंदे सामाजिक कार्यकर्ते गजानन गाडगे यांच्या सह पत्रकार यांची उपस्थिती होती.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा