आमदाराच्या आवाहणानंतरही रावण दहन
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी रावण दहन करू नका असं आवाहन केल्या नंतरही अकोल्यातील तुकाराम चौक येथे राष्ट्रवादीच्याच शिवा मोहोड यांच्या आयोजनात रावण दहन करण्यात आले. हे रावण दहन भाजपचे विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस उपस्तिथ होते. एकीकडे आमदार सांगतात रावण दहन बंदी संदर्भात हिवाळी अधिवेशनात प्रश्न उचलू आणि दुसरीकडे कार्यकर्ते रावण दहन करत आहेत.