सायवणी ते मळसूर रस्त्याचे काम निकृष्ट.

सायवणी ते मळसूर रस्त्याचे काम निकृष्ट.

सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला कार्यकारी अभियंता यांचे रोड संदर्भात पाठ फिरवून कंत्राटदाराला अभय,

सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार ताले यांचे दिन 25/10/23 पासून आमरण उपोषण सुरु-

सायवणी ते मळसूर या डांबरीकरण रस्त्याचे काम ७/८ महिन्यापासून सुरु असून संबंधीत कामाचे . शासकीय अंदाजपत्रकाचे फलक दि. 26/10/23 रोजी आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लावण्यात आले, ज्यावर कामाचा कार्यारंभ आदेश हा ३/०८/२३ रोजीचा आहे. परंतू त्या आधी कित्येक महीने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर जे अपघात झाले त्याची जबाबदारी ठेकेदार घेतील का असा संतप्त सवाल सामान्य जनता विचारत आहे. शिवाय, २,६६,१५,५९१/- रुपये किंमतीच्या रस्त्याच्या बाजु ह्या विहिरीवरचा व कॅनॉलचा बांध फोडून उत्खनन केलेल्या मुरुमाने भरण्यात आल्या असून शासकीय अंदाजपत्रकात ज्या प्रमाणे तरतुदी आहेत तश्या प्रकारे काम झालेले नाही. तसेच मुरुमाच्या रॉयल्टी हया कमी काढून शेकडो ब्रास मुरुम त्या रोडवर टाकण्यात आला मा. तहसीलदार यांना सुद्धा वारंवार निवेदन देवून आंदोलने की केली. परंतू त्यावर सुद्धा तहसीलदार यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे विजय कुमार ताले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

रस्त्याचे काम हे निकष्ट दर्जाचे होत असून संबधीत सार्व. बां. विभागाचे अभियंता हेमंत राठोड यांनी जाणून-बुजून या बाबीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोष विजयकुमार ताले यांनी केला आहे. तसेच रस्त्याची चौकशी दक्षता व गुणनियंत्रक मंडळ अमरावती यांचे मार्फत करून तयार केलेल्या अहवालाची प्रत उपोषण कर्त्याला देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवाय कंगाटदाराचे नांव काळ्या यादीत टाकावे ही प्रमुख मागणी पूर्ण होईपर्यंत ते आमरण उपोषण मागे घेणार नाहीत असेही ते म्हणाले. शिवाय कार्यकारी अभियंता हे कंत्राटदार सावजी यांना अभय का देत आहेत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून वरिष्ठ विभागाकडून कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग अकोला यांची चौकशी व्हावी ही सुद्धा विजय कुमार ताले यांची मागणी आहे.

दि. 25/10/23 पासून आमरण उपोषण सुरु असून सा. बां. विभाग अकोला यांनी आतापर्यंत उपोषण मंडपाकडे पाठ फिरविली असून, भ्रष्टाचाऱ्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे. जोपर्यंत उपोषणकर्ता विजयकुमार ताले यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तो पर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत असेही ते म्हणाले.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news