उड्डाणंपुल दुरुस्ती करताना जुने तुटलेले ब्लॉक बसवण्यात आल्याने “हा भाजपचा भ्रष्टाचार” फलक लावून ऊबाठा गटाचे आंदोलन!
अकोला शहरामध्ये अशोक वाटिका चौक जवळ नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणंपुलाचा काही भाग तुटल्या नंतर त्याला थातूर मातुर काम करुण दुरुस्ती करण्यात आले आहे.परंतु उड्डाणंपुल दुरुस्ती करताना त्याच्यात जुने तुटलेले ब्लॉक बसवण्यात आले. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने अशोक वाटिका चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. या तुटलेल्या त्यामुळे ब्लॉक मुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सदर कंपनीने अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे हा उड्डाणपूल खसला आहे. आज शिवसेनेच्या वतीने सदर उड्डाण पुलावर धोका असल्याचे चित्र काढून निश्चित व्यक्त करण्यात आला. सदर उडान पुलावर” हा भाजपचा भ्रष्टाचार ” फलक लावून तुटलेल्या ब्लॉक वर नंबर टाकून व त्यावर सुद्धा धोका असलेले चित्र काढून सदर उड्डाण पुलावर धोका असल्याचे फलक लावून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात
अकोला पश्चिम शहरप्रमुख राजेश मिश्रा,
अकोला पश्चिम शहरप्रमुख राजेश मिश्रा, पुर्व शहरप्रमुख राहुल कराळे,अतुल पवनीकर,मंगेश काळे,गजानन बोराळे,देवेश्री ठाकरे. तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आणि अशा स्थिती सुद्धा श्रेया लाटण्याकरिता भाजपाचे नेत्यांनी वाहतुकीसाठी पुल पुन्हा सुरू करण्यात आले या पुलामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे की भविष्यात इथे काही अप्रिय घटना घडू शकते.या करीता शिवसेना च्या वतीने वारंवार आंदोलन करण्यात आले तरी या झोपे च्या सोंग घेणाऱ्या सरकारला पुन्हा जागे करण्या करता शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा व अकोला शहर पदाधिकारी हे त्या उड्डाणपुलाचे जितके ही खड्डे आहे त्यावर शिवसेनेच्या वतीने हे उड्डाण पुलाचे गड्डे अकोलेखरांच्या लक्षात आले पाहिजे की या पुलामध्ये किती भाजपा कडून किती भ्रष्टाचार झालेला आहे या करिता शिवसेनेच्या वतीने प्रत्येक तुटलेले ब्लॉकला नंबर देण्यात आलेले आहे.
खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.