भर चौकात इसमाची निर्घृण हत्या पोलिसांनी संशयितास घेतले ताब्यात ?
अकोला – मुर्तिजापूर शहरातील भगतसिंग भर चौकात सायंकाळच्या सुमारास निर्घृण खून केल्याची घटना दिनांक 27 ऑक्टोबर शुक्रवारी घडली, या घटनेची माहिती शहरात पसरताच खळबळ उडाली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेतील संशयित ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे,
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक भगतसिंग चौकातील सुरेश देशमुख वय 58 याची भगतसिंग चौकात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली,
सुरेश देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून सदर हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
सुरेश देशमुख याच्यावर निर्दयतेने तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत त्याची हत्या खुण करुन घटनेतील संशयित घटना स्थळावरून पसार झाला, दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार भाऊराव घुगे घटनेची माहिती वरीष्ठ अधिकारी यांना देऊन पोलिस ताफा सह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करुन या घटनेतील संशयित ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस करत आहेत