सोयाबीनला सहा हजार हमीभाव द्या -शिवराम डिक्कर
एकदिवशीय अन्नत्याग उपोषण करू
अकोट प्रतिनिधी
सोयाबीन वर येलो मोझ्याक आल्या मुळे उत्पादनात घट आली असून. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पीकविम्यासह 6 हजार हमी भाव देण्यात यावा. महागडे बियाणे घेऊन लावलेला खर्च बरोबरी होत असून हाती शिल्लक काहीच पैसे उरत नाहीत. पुढच्या महिन्यात दिवाळी सण असून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होणार नाही. ही शासनाने लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना शेतमालाचा हमीभाव देण्यात यावा. अन्यथा एक दिवसीय अन्नत्याग उपोषण आम्ही कॉग्रेस NSUI तर्फे करू .कॉग्रेस कमेटी जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष महेश गणगणे यांचा मार्गदर्शनात कॉग्रेस NSUI चे तालुकाध्यक्ष शिवराम डिक्कर यांनी अशा आशयाचे निवेदन अकोट तहसीलदार यांना दिले.