हिवरखेड वासियांनी आदिशक्ती ला दिला भावपूर्ण निरोप
विसर्जन मिरवणुकीत १२ मंडळाचा सहभाग
मनोज भगत
तेल्हारा ग्रामीण
हिवरखेड – गत १५ ऑक्ट पासून अतिशय धार्मिक भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात सुरु असलेल्या नवरात्र महोत्सवाची २६ ऑक्टोबर गुरुवार रोजी विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली. नवरात्र महोत्सवाचा पाश्वभूमीवर नवदुर्गा उत्सव मंडळानी हिवरखेड शहरात विविध धार्मिक तसेच सामाजिक व सांस्कृतिक , पारंपारीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बालाजी मंदिराच्या सभागृहात गरबा नृत्य सादर झाले. गुरुवार संध्याकाळी रोजी संध्याकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत एकूण १२ मंडळाचा समावेश झाला. विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलीसानाचा तगडा बंदोबस्त होता. मिरवणुकी दरम्यान एसडीपीओ रितू खोकर ठाणेदार गोविंद पांडव यांनी बंदोबस्त चोख ठेवला.