अठरा वर्ष नव्याने झालेल्या मतदारांची यादी पातुर तालुक्यातील 129 मतदान क्रेद्रावर जाहीर  

अठरा वर्ष नव्याने झालेल्या मतदारांची यादी पातुर तालुक्यातील 129 मतदान क्रेद्रावर जाहीर  
पातूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर दि. 04 नोव्हेंबर 2023 शनिवार व रविवार या दिवशी नव्याने नोंदनी करण्यात येणार आहे
या करीता नवीन युवक, युवती यांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता आपले नाव नोंद करण्याचे आव्हान पातुर तहसीलदार रवी काळे यांनी केली आहे
दिनांक ०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकवर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुररिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक २७.आक्‍टोंबर २०२३ रोजी पातूर तालुक्‍यातील १२९ मतदार केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.  या अगोदर पातूर तालुक्‍यात एकुण १२७ मतदान केंद्र होते परंतु मा. भारत निवडणुक आयोगाच्‍या निर्देशानुसार मतदान सुसुत्रिकरणामध्‍ये पातूर तालुक्‍यातील वसाली व वनदेव येथे नविन मतदान केंद्र प्रस्‍तावित करण्‍यात आले होते व त्‍या केंद्राना आयोगाकडुन मान्‍यता सुध्‍दा मिळाली त्‍यामुळे आज रोजी पातूर तालुक्‍यात एकुण १२९ मतदान केंद्र आहेत. १२९ मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्‍ती सुध्‍दा करण्‍यात आलेली आहे. तसेच पातूर तालुक्‍यातील BLO यांचे वरील नियंत्रण अधिकारी म्‍हणुन मा. आयोगाचे निर्देशानुसार एकुण १३ पर्यवेक्षक यांची सुध्‍दा नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.  मा. आयोगाने मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे करिता बिएलओ अॅप (BLO APP) दिलेले असुन मा. आयोगाचे कार्यक्रमानुसार व प्राप्‍त सुचने नुसार BLO मतदारांचे नावाची नोंदणी, मतदान यादीमधील तपशीलातील दुरुस्‍ती व मतदार यादीतील नावाची वगळणी हे काम बिएलओ अॅप मध्‍ये ऑनलाईन करतात मतदार यादीतील सर्व नावांची पडताळणी ८० वर्ष किंवा तयावर वय असलेल्‍या मतदारांची पडताळणी, दुबार मतदारांची पडताळणी PSE फोटो सेमीलर ऐन्‍ट्री ची पडताळणी DSE डुपलीकेड सेमीलर ऐन्‍ट्रीची पडताळणी तसेच मतदारांचे नोंदणी कॅम्‍प घेऊन मतदार नोंदणी करतात.
पातूर तालुक्‍यातील सर्व मतदान केंद्रावर  दिनांक ०४ नोव्‍हेंबर २०२३ शनिवार व ०५ नोव्‍हेंबर २०२३ रविवारला मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी स्‍पेशल कॅम्‍प घेणार असुन ज्‍या मतदारांना नोंदणी करावयाची आहे त्‍यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्‍या नावाची नोंदणी करुन घ्‍यावी. तसेच आपण स्‍वत: VOTER HELPLINE APP व्‍दारे करावी.  असे आव्‍हान  श्री रवि काळे, तहसीलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी वि.स.म.सघ बाळापुर यांनी केले आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news