ठाणेदार किशोर शेळके यांनी केला महिला पत्रकार यांचा जन्मदिवस साजरा
पातूर येथील होमगार्ड तालुका समादेशक तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ तालुका सचिव, पातुर तालुक्यातील पहीली महिला पत्रकार संगीता इंगळे यांचा वाढदिवसानिमित्त पातुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर शेळके यांनी
एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा होमगार्ड माजी जिल्हा समादेशक तथा.खामगाव अर्बन बँकेचे माजी संचालक, बुलढाणा भा ज पा नेते,सेवावृत्ती प्राध्यापक श्री. जगदेवरावजी बाहेकर यांनी.
धावती भेट दिली.होमगार्ड तालुका समादेशक संगीता इंगळे तथा पत्रकार यांना वाढदिवसानिमित्त जगदेवरावजी बाहेकर यांनी श्री.भवानी मातेची प्रतिमा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.व उपस्थित होमगार्ड सैनिकाशी चर्चा केली.या वेळी पातुर येथेल जेष्ठ पत्रकार प्रदीप काळपांडे, पत्रकार दुलेखान, परशराम देवकर,यांनी पातुर पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी व पातुर पथक महिला पुरुष होमगार्ड उपस्थित होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा