जुनी पेन्शनच्या हक्कासाठी शिक्षक कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा
वेगवेगळ्या टप्प्यात राज्य भर आंदोलनाचा इशारा
आता आरपारचा लढा
संजय तायडे
तालुका प्रतिनिधी सत्य लढा
राज्यातील दि 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशीच लागु करावी या मागणीसाठी आता राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यां सह शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य व जुनी पेन्शन कोअर कमिटी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आंदोलन वेगवेगळ्या टप्प्यात छेडले जाईल, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आपल्या हक्काच्या जुनी पेन्शन साठी राज्य भर दिनांक 1 नोव्हेंबर २०२३ निषेध दिनाचे प्रतीक म्हणून काळ्या फिती लावून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी काम करतील.प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिवसभर काळ्या फित लावुन कामकाज सुरू राहील अशोक वाटीका,अकोला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अभिवादन करून तेथुन शांततेने लॉंग मार्च काढुन अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 31 ऑक्टोबर 2005 रोजी निर्णय पेन्शन विरोधी शासन निर्णयाचा निषेध करण्यात येईल. शासनाने त्वरित जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे, दरम्यान लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा सह आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन छेडले जाईल जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत पर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार संगीताताई शिंदे अध्यक्षा शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य व जुनी पेन्शन कोअर कमिटी यांच्या सह विविध शैक्षणिक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी राज्य भर आंदोलनाचा इशारा दिला आहे , या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर व राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना अकोला जिल्हा यांनी केले आहे.