स्वस्त धान्य दुकानदाराने ग्राहकांची केली फसवणूक!
अकोला जिल्ह्यातील अकोला तहसील अंतर्गत येणाऱ्या टाकळी खुद येथील स्वस्त धान्य दुकानदाराने
सप्टेंबर महिन्यातला माल वाटप न करिता सर्व नागरिकांचे अंगठे घेतले व माल न डेटा ग्राहकाची फसवणूक केली RC बुक चेक केले असता मानला दिला नसल्याचे आढळून प्रत्यक्षात सदर स्वस्त धान्य दुकानाचा माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचलाच नाही. संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराला विचारणा केली असता. स्वस्त धान्य दुकानदाराने संबंधित ग्राहकांना म्हटले की मी तुमचा माल विकला आहे. तुम्ही माझी तक्रार केली तरी मला काही फरक पडत नाही मी अधिकस्यांना भरपूर पैसे देत असतो माझे कुणीही काही बिघडवू शक्त नाही असे बोलून ग्राहकांची फसवणूक केली .
प्राप्त माहितीनुसार दि.19 ऑक्टोंबर रोजी सर्व नागरिकांना बोलावून त्यांचे अंगठे घेतले शिद्याचे वाटप येत आहे. आल्यावर देतो असे म्हटले व त्या दिवशी स्वस्त धान्य दुकानात मालाला असता ग्राहकांनी धान्य देण्याची मागणी केली असता संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराने धान्य देण्यास नकार दिला व ऑक्टोबर महिन्याचा वाटप करीत असताना मागील महिन्याच्या वाटपाची विचारणा केली तुमचा माल मी विकला. तुमच्याकडून जे होते ते करा असे उत्तर देऊन. सदर ग्राहकांची स्वस्त धान्य दुकानदाराने ग्राहकांची फसवणूक केली होती. याची तक्रार बाळकृष्ण शालिग्राम सोनोणे यांनी तसेच ग्रामस्थांनी तहसीलदार . तालुका दंडाधिकारी तालुका पुरवठा अधिकारी यांना तक्रार केली असता सदर तक्रारीची दखल घेत पुरवठा अधिकारी यांनी सदर स्वस्त धान्य दुकानात जाऊन चौकशी चौकशी केली संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराने ग्राहकांचे अंगठे घेत माल दिला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता संबंधित स्वस्त धान्य दुकानावर काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.