अन्यायकारक घर टॅक्सविरोधात बाळापूर शहर कडकडीत बंद
अन्यायकारक घर टॅक्सविरोधात सोमवारी बाळापूर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकऱ्यांनी बंदचे आवाहन केले होते.रविवारी रात्री सर्वपक्षीय पदाधिकऱ्यांनी शहरातील प्रतिष्ठानांना भेटी देऊन शहरात शंभर टक्के बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन केले.त्या आवाहनाला प्रतिसाद देत बाळापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
अन्यायकारक घर टॅक्सविरोधात शहर बंद केले असून दुपारी १वाजे नंतर शहरातून सर्वपक्षीय मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून अवाढव्य आकारला गेलेला घर टॅक्स कमी करण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी बाळापूर शहर वासियांकडून करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला