मोबाईल मोबाईल टॉवरवर चढून युवकाचे शोले स्टाईल आंदोलन.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव शहरात लघु शंका करण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने वाडेगावच्या युवकाने थेट मोबाईल टॉवर वर चढून अनोखे आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.शैलेश मापारी असे या आंदोलनकर्त्या युवकाचे नाव आहे. या बहाद्दराने आज बेसिक शाळेच्या मोबाईल टॉवर वर चढून आंदोलनास सुरुवात केली.
वाडेगाव शहरात ग्रामीण भागातील अनेक खेडी गावे जोडली आहेत.त्यामुळे शहारत नेहमी वर्दळ असते.परंतु अनेक वर्षापासून शहरात लघु शंका करण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने आज मापारी या युवकाने मोबाईल टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.यावर काय तोडगा काढण्यात येईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर