अकोल्यातील मराठा आरक्षण चा मुद्दा पेटणार आता नारीशक्ती ने दिला अन्नत्याग जल त्यागचा इशारा!
मराठा आरक्षण प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबीत ठेवल्या जात आहे. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आता ठोस पाऊल उचलले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला आहे.
अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, उपोषणे झाले. शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अनेकवेळा खोटे आश्वासन दिले परंतु ते आश्वासन शासनाचा फुसका बार ठरले. त्यामुळे आता मराठा समाजाचा बांध फुटला असून आता राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसापासून अकोल्यातील आंदोलनाचा तिसऱ्या दिवशीही आंदोलनास विविध संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शीला आहे. तर
विविध संघटनेने तसेच ग्रुपने आज अन्यत्याग सत्याग्रहाला पाठिंबा दिला आहे. समाजसेवक गजानन हरणे यांचे जिल्हाधकरी कार्यलय समोर जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अन्नत्याग आंदोलनास आज तिसरा दिवस असून
मराठा आरक्षणावर लवकर निर्णय घेतल्यास मराठा समाजातील नारीशक्ती लवकरच अन्न व जलत्याग करणार असल्याचे यावेळी शासनाला इशारा देण्यात आला आहे.