डॉ.मुदस्सीर अली यांना क्रांती योद्धा शिक्षक पुरस्कार
मनोज भगत
२९ ऑक्टोबर रोजी तेल्हारा येथे आयोजित नवक्रांती शिक्षक संघटना व लिटिल स्टार कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांती योद्धा शिक्षण पुरस्काराने प्रा.बाप्पूमिया सिरजोद्दीन पटेल आर्ट कॉलेज,पिंपळगाव काळे येथील प्राध्यापक डॉ.मुदस्सीर अली मसूद अली यांना सन्मानित करण्यात आले. आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते डॉ.मुदस्सीर अली यांचा सत्कार करून त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. ही उपाधी त्यांचे शाळेमध्ये उत्कृष्ट कामगिरी व उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व प्राध्यापकवृंदांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.