अखेर वंचित युवा आघाडीनेच लावले वसंतराव नाईक यांचे नामफलक.
अकोला दी. १ स्थानिक अग्रसेन चौकला लागुन वसंत बाग मध्ये माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या पाठीमागच्या भिंती वर वसंतराव नाईक यांच्या फोटो असलेले फलक अस्पष्ट असून ते तातडीने बदलण्याची मागणी युवा आघाडीने कली होती, मात्र क्रीडा अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने वंचित बहुजन युवा आघाडी ने आज १२ जुलै ला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात धडक दिली आणि सदर फलक लावून घेतला.गेली अनेक दिवस हे फलक लावण्याचा आग्रह होत असताना कधी जिल्हा क्रीडा संकुल समिती, जिल्हाधिकारी ह्यांचे नाव सांगुन फलक लावायला टाळले जात असल्याने युवा आघाडीने पुढाकार घेतला आणि आज फलक लावून घेतला.युवा आघाडी प्रदेश महासचिव तथा प्रदेश प्रवक्ते राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आघाडी पदाधिकारी यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सतत हरित क्रांती चे जनक माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतरावजी नाईक यांचे फलक लावण्याबाबत कॉल केला होता.त्यांचे कडून नीट प्रतिसाद नसल्याने युवा आघाडने वसंतराव नाईक साहेबांच्या फलक लावून घेतला.सोबतच पुतळ्याचे पूजन केले.सदर जागा ही जिल्हा परिषदची असून क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी दिला आहे, त्यात पक्षाचा वाटा आहे हे भान क्रीडा विभागाने जपावे असे आवाहन देखील यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा कोषाध्यक्ष दादाराव पवार, बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, तालुका महासचिव अक्षय राठोड ह्यांनी केले आहे.फलक लावणे व पूजन प्रसंगी मिडिया प्रमुख ऍड प्रशिक मोरे, आशिष मांगुळकर (पश्चिम महानगर अध्यक्ष), सचिन शिराळे, धर्मेंद्र दंदी, आकाश जंजाळ, वैभव खडसे, रक्षक जाधव, नारायण चव्हाण, आकाश सावळे, प्रदीप जाधव, विशाल गवई, संदीप दामोदर, प्रफुल वरठे, विशाल इंगळे, शीलवंत ढोले, सनी धुरंधर, नितीन दामोदर, सतीश इंगळे, आदित्य निखाडे, हर्षराज राठोड, ऋतिक जाधव उपस्थीत होते.