पातूर नगर पालिके सह महावितरण ला शिवसेने चे निवेदन

पातूर नगर पालिके सह महावितरण ला शिवसेने चे निवेदन

पातूर शहरासह परिसरातील शेतकऱ्यांना शेती विषयक विजपुरवठा नियमित करण्यासाठी शिवसेना सरसावली

त्याच बरोबर पातुर शहरातील मुख्य व्यावसायिक बाजार पेठ मधील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना केली

शिव सेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पातूर शहर प्रमुख निरंजन बंड यांचे निवेदनाद्वारे उप कार्यकारी अभियंता यांच्या कडे मागणी

पातुर शहरातील व ग्रामीण भागातील शेतकरी हे आता गहु, हरभरा, या रब्बी पिकांकडे वळत आहेत परंतु शेतकऱ्यांना हे पिक काढणी करीता लागणारी मुबलक वीज पुरवठा हा मिळत नसल्याने शेतकरी वर्गाला मोठ्या कसरती कराव्या लागतात त्यातल्या त्यात आसमानी संकटांना तोंड द्यावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करता शिव सेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पातूर शहर प्रमुख निरंजन बंड यांनी वितरण कंपनीचे उप विभागीय अभियंता पातुर यांना निवेदन दिले आहे
तसेच पातुर शहरातील मुख्य व्यावसायिक बाजार पेठ असलेल्या नगर परिषद सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे या मुळे सर्व व्यावसायिक यांना पायपीट करावी लागत आहे त्यामुळे नगरपरिषद मुख्य अधिकारी सैय्यद ऐसानोद्दीन यांना ही बाब लक्षात आणून सार्वजनिक शौचालयाची सुधारणा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी पातुर शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख निरंजन बंड, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सागर रामेकर, परशराम उंबरकार, अनिल निमकंडे, सुनील गाडगे, अंबादास देवकर, कैलास बगाडे,सागर कढोणे,अजय पाटील, विशाल तेजवाल, आनंद तायडे, दिपक देवकर,जिवन ढोणे, दिनेश काळपांडे, प्रल्हाद गवई , रवी काकड, मुक्तार भाई, राजूभाऊ हाडके, पिंटू इंगळे, सचिन पाटील, रवी पाटील, जगदीश आमले, महादेव खंडारे, सचिन उंबरकर, निशांत काळपांडे, गणेश पाटील, इत्यादी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news