मराठा बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत समाजसेवक गजानन हरणे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा समारोप
अकोला:-…………………….
मराठा आरक्षणाकरिता मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ अकोला येथे समाजसेवक गजानन हरणे यांनी 29 ऑक्टोबर पासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलन आज सकाळी सहाव्या दिवशी आमदार नितीन देशमुख,डॉ, शफी अहमद व सौ.युगेश्वरी गजानन हरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन बालकांच्या हस्ते शरबत घेऊन समाप्त केले यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे गेल्या सहा दिवसापासून गजानन हरणे यांचा अन्नत्याग सत्याग्रह सुरू होता. अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी प्रतिसाद दिला दररोज वेगवेगळे समाज घटक आंदोलन स्थळी एक दिवस लाक्षणिक उपोषण करीत होते. गोंधळ, मुंडन, भजन असे अनेक कार्यक्रमही सत्याग्रह मंडपात होत होते. आमदार,माजी आमदार व खासदार,माजी मंत्री,डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, इंजिनियर, बिल्डर,व्यापारी, उद्योजक , पत्रकार,शिक्षक ,विद्यार्थी, महिला, मुली, , राजकीय, सामाजिक अश्या सर्व स्तरातील समाज बांधवांची उपस्थिती होती.जवळपास १५०चे वर राजकीय सामाजिक शैक्षणिक जातीय धार्मिक संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गजानन हरणे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला व मराठा आरक्षणाला पाठिंबा नोंदविला होता हे विशेष आहे. आर्किटेक्ट अनंत गावंडे यांनी मराठायोद्धा गजानन हरणे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहामागची भुमिका विषद केली. जेंव्हा जेंव्हा समाज व सामान्य जनता अडचणीत आली तेंव्हा तेंव्हा गजानन हरणे यांनी उपोषणासह व विविध आंदोलनाद्वारे जनतेला न्याय मिळवून दिला त्याच अंतर्गत मराठा आरक्षणाकरिता मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी याकरिता त्यांचे समर्थनार्थ अकोला येथे अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला असे सांगितले यावेळी आमदार नितीन देशमुख ,डॉ. शफि अहमद, ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, डॉ अभय पाटील,डॉ सुभाष कोरपे, मराठा महासंघाचे विनायक पवार, राम मुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, डॉ
अमोल रावणकर,शेतकरी जागर मंचचे रवी अरबट, भाजपचे डॉ. अशोक ओळंबे, समाजसेविका श्रीमती कमलजित कौर, यांची समयोचित भाषणे झाली शिवसेना नेते मंगेश काळे, प्रमोद धर्माळे ,बाळू पाटील ढोले, देवराव पाटील मराठा सेवा मंडळाचे नरेश सूर्यवंशी, संदीप पाटील, प्रदीप चोरे, तुषार जायले, अविनाश पाटील, शरद वानखडे, गिरीश गावंडे, पुजा काळे, श्रीमती ताथोड,सौ मृदुला गावंडे यांची उपस्थिती होती. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा प्रहार जनशक्ती जमाती इस्लामी वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांसह मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ मराठा सेवा मंडळ धनगर युवक मंडळ सह्याद्री मराठा मंडळ अशा सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला होता आज मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अनंत गावंडे यांनी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना समाजसेवक गजानन हरणे यांनी सर्वांचे आभार मानले. शासनाने मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण देण्याची हमी मनोज जरांगे पाटील यांना दिली यावरून त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. दिलेल्या अवधीत शासनाने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास अकोल्यात पुन्हा तीव्र लढा उभारण्यात येईल असा इशारा गजानन हरणे यांनी यावेळी दिला .तसेच 2 जानेवारीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात जाऊन मराठा आरक्षण जनजागृती अभियान राबविण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. गजानन हरणे यांनी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित त्यांनी दिले मराठा आरक्षण संदर्भात घोषणा देऊन अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता करण्यात आली.